विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या ग्रंथालयात १) सकाळ २)लोकमत ३)टाइम्स आँफ इंडिया ही वर्तमानपत्रे दररोज येतात.
शाळेतील इ .५ वी ते इ .१० वी तील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातून सोमवार ते शनिवार अवांतर वाचनाची पुस्तके घरी वाचनासाठी दिली जातात.
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांकडून पुस्तक ग्रंथालयास भेट दिले जाते. अशा प्रकारे अनेक पुस्तके ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.
ग्रंथालयात शिक्षण संक्रमण व जडण घडण अशी दोन शैक्षणिक मासिके शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी दरमहा येतात.
२३ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते .
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील आजपर्यंतची एकूण पुस्तक संख्या खालीलप्रमाणे आहे.
अवांतर वाचनाची पुस्तक संख्या = ८५४९
क्रमिक(अभ्यासेत्तर ) पुस्तक संख्या =१७०२
ग्रंथालयातील एकूण पुस्तक संख्या = १०२५१



