संगणक विभाग

आपल्या प्रशालेत संगणक विभागाची सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. यामध्ये विद्यार्थी संगणक प्रात्यक्षिक करतात. यासाठी त्यांना ४० संगणकाची सुविधा प्राप्त करून दिलेली आहे  संगणक लॅब  मध्ये सर्व संगणकाला इंटरनेट सुविधा दिली आहे.  

इयत्ता ५ वी साठी पेंट, नोटपॅड, वर्डपॅड, कॅल्कुलेटर या अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे.

इयत्ता ६ वी साठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस, लोगो प्रात्यक्षिकाचा अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे.

इयत्ता ७ वी साठी मायक्रोसॉफ्ट पॉवरपोइंट या अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे.

इयत्ता ८ वी साठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल , ई – मेल , सर्च इंजीन चा वापर  या अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे.