
आपल्या शाळेत एनसीसी ची सुरुवात 2012 ला झाली.
आपल्या शाळेतील एनसीसी विद्यार्थ्यांचा ग्रुप 50 कॅडेटचा आहे. यामध्ये प्रथम वर्ष 25 व द्वितीय वर्ष 25 कॅडेट असतात.
नवीन प्रथम वर्षासाठीच्या कॅडेट ची निवड आठवी मधून केली जाते.
यावर्षी द्वितीय वर्षाचे 28 कॅडेट असल्याने 22 कॅडेट ची प्रथम वर्षासाठी भरती होणार आहे.
सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला एनसीसी विभागामार्फत घेतलेले उपक्रम
1. पुनीत सागर अभियानांतर्गत दिनांक 5/6/ 2023 रोजी बारामती जुनी कचेरी शेजारी क-हा नदी स्वच्छता अभियान राबवले
2. दिनांक 21/6/2023 रोजी योग दिन साजरा करण्यात आला.
3. पर्यावरण संरक्षणानिमित्त 22/6/2023 रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले.
4. दिनांक 17 /7/2023 रोजी वन संरक्षण दिनानिमित्त 2000 रोपांची रोपवाटिका तयार केली.
5 . दिनांक 26 /7/ 2023 रोजी कारगिल विजय दिनानिमित्त बारामती भिगवन चौक शहीद स्तंभाच्या शहिदांना आदरांजली व रॅली
6. 26/7/2023 रोजी कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या सैनिकांचा व शहीद जवानांच्या वडिलांचाव वीर पत्नींचा सन्मान
करण्यात आला.

